Indian Navy : मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजांची जाणून घ्या वैशिष्ट्ये
आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडींचा नौदलात समावेश झाल्याने देशाची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होण्यास फायदेशीर ठरणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईच्या भारतीय नौदलात आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली. आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडींचा नौदलात समावेश झाल्याने देशाची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होण्यास फायदेशीर ठरणार आहेत. विशेष म्हणजे यातील दोन युद्धनौका आणि पाणबुडी मुंबईच्या माझगाव डॉकमधील शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये बनवण्यात आली आहे. यातील आयएनएस सूरत ही स्टेल्थ गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर असून आयएनएस नीलगिरी प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत डिझाईन करण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आहे. तर आयएनएस वाघशीर ही स्कॉर्पिन-क्लास सबमरीन पाणबुडी आहे. दरम्यान, बदलत्या परिस्थितीत या युद्धनौका भारतासाठी असल्याने जाणून घ्या या युद्धनौका-पाणबुड्यांचे वैशिष्ट्य…