Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मोदींना गहिवरून आलं; म्हणाले, मी रामलल्लाची माफी मागतो कारण….
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं आज लोकार्पण झालं प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येच्या भव्य मंदिरात शुभ मुहूर्तावर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील संपूर्ण प्राणप्रतिष्ठापनेचा विधी संपन्न झाला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं आज लोकार्पण झालं. प्रभू श्रीरामचंद्र आज अयोध्येच्या भव्य मंदिरात शुभ मुहूर्तावर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील संपूर्ण प्राणप्रतिष्ठापनेचा विधी संपन्न झाला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राम मंदिर पुन्हा साकार होणं ही एक मोठी तपश्चर्या असल्याचे मोदींनी म्हटले. तर गुलामीची मानसिकता तोडून राष्ट्र उभं राहिलं. मी यावेळी दैवी अनुभव घेत आहे. ज्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण झालं आहे, ते दिव्य आत्मा आपल्या आसपास आहेत. मी या दिव्य चेतनेलाही नमन करतो. मी आज प्रभू श्रीरामांकडे क्षमा, याचनाही करत आहे. आमच्या त्याग आणि तपश्येत काही तरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच इतकी शतके आपण हे काम पूर्ण करू शकलो नाही. आज ही उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आज आपल्याला आवश्य क्षमा करतील, असेही मोदी यांनी म्हटले.