PM Modi Voting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक पार पडतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. कुठे केलं मतदान?
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी आपलं मतदान केलं. लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गांधीनगर येथील मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये एकूण २५ जागा आहेत. त्यापैकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे २४ जागांसाठी आज लोकसभेचं मतदान होतंय. ‘आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे केले. तर आपल्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील, असेही मोदींनी मतदारांना सांगितले.