PM Modi : जिथे तुम्ही तिथे माझे सण-उत्सव, जवानांसोबत साजरी केली मोदींनी दिवाळी, काय व्यक्त केली कृतज्ञता?

PM Modi : जिथे तुम्ही तिथे माझे सण-उत्सव, जवानांसोबत साजरी केली मोदींनी दिवाळी, काय व्यक्त केली कृतज्ञता?

| Updated on: Nov 12, 2023 | 4:53 PM

140 कोटी देशवासियांचा हा मोठा परिवारही तुमचाच आहे. त्यामुळे हा देश आपला ऋणी आहे. मोदी म्हणाले, अयोध्या हीच आहे जिथे प्रभू राम आहेत, जिथे भारतीय सैन्य आहे, जिथे सुरक्षा दल तैनात आहे, ती जागा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. जिथे तुम्ही तिथे माझे सण-उत्सव आहेत, असे मोदी म्हणाले.

हिमाचल प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदी म्हणाले, हा एक समाधान आणि आनंदाने परिपूर्ण असा क्षण आहे. यंदाच्या दिवाळीत देशवासियांना आयुष्यात सकारात्मक घडेल, असा मला विश्वास आहे. तसेच यावेळी मोदींनी देशातील तमाम देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, असे म्हटलं जातं की, जिथं कुटुंब असतं तिथं सण-उत्सव असतात. सणासुदीच्या दिवशी तुमच्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात असल्याने तुमचं कर्तव्यचं तुमचे सण उत्सव तुम्ही मानतात. प्रत्येकाला कुटुंबाची आठवण येते पण तुमच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नाही. तुमच्यात एक प्रकारची ऊर्जा आहे कारण तुम्हाला माहित आहे की 140 कोटी देशवासियांचा हा मोठा परिवारही तुमचाच आहे. त्यामुळे हा देश आपला ऋणी व कृतज्ञ आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, अयोध्या हीच आहे जिथे प्रभू राम आहेत, जिथे भारतीय सैन्य आहे, जिथे माझ्या देशाचे सुरक्षा दल तैनात आहे, ती जागा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. जिथे तुम्ही तिथे माझे सण-उत्सव आहेत, असे मोदी म्हणाले.

Published on: Nov 12, 2023 04:53 PM