इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता…, मोदींचा काँग्रेस अन् इंडिया आघाडीवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथे आज जाहीर सभा घेतली. यावेळी सभेत अहमगनगर वासियांना संबोधित करताना आपल्या भाषणाची मराठीतून सुरूवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथे आज जाहीर सभा घेतली. यावेळी सभेत अहमगनगर वासियांना संबोधित करताना आपल्या भाषणाची मराठीतून सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. भाजप आणि एनडीएचे मुद्दे कोणते आहेत ते तुम्हीच बघा. एनडीएचा मुद्दा विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान असे आहेत मात्र काँग्रेस यावर बोलते का? असा सवाल करत इंडिया आघाडीच संविधान बदलू इच्छित आहे. आपल्या वोट बँकेला खूश करण्यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे. ते कोणतीही पातळी गाठू शकता. मात्र तुम्ही तसं होऊ देणार का? असे म्हणत मोदींनी टीका केली. काँग्रेसने सुरु केलेल्या समस्या संपवून मोदीने गेल्या दहा वर्षात सुरक्षा आणि विकास दोघांची गॅरंटी दिल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले.