इंडिया आघाडीला २०२४ मध्ये किती जागा मिळणार? नरेंद्र मोदी यांनी थेट सांगितलं…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान मोदी यांचा चेहरा असल्याने इंडिया आघाडीची टक्कर मोदींशीच होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी विरोधी बाकांवरच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, असे वक्तव्य करत विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोचक टोला
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उमेदवार देण्याची चर्चा झाली. याच चर्चेतून मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पुढे आल्याचे पाहायला मिळाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान मोदी यांचा चेहरा असल्याने इंडिया आघाडीची टक्कर मोदींशीच होणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी विरोधी बाकांवरच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, असे वक्तव्य करत विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोचक टोला लगावला आहे. तर इंडिया आघाडीला २०२४ च्या निवडणुकीमध्ये आत्तापेक्षाही कमी जागा मिळतील, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांवर हा जोरदार हल्लाबोल केलाय. तर भारताचे भविष्य उज्ज्वल बनवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.