सोलापुरात भाषण करताना मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं, आवंढा गिळला अन्...

सोलापुरात भाषण करताना मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं, आवंढा गिळला अन्…

| Updated on: Jan 19, 2024 | 4:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रातील सोलापुरच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात काही प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. यावेळी सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर, १९ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी महाराष्ट्रातील सोलापुरच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरात काही प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात भाषण केले. सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मोदी म्हणाले, ‘पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण आज झाले. मी ही घरे पाहिली, त्यानंतर मला हेवा वाटला’, असं बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना काही सेकंद थांबले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सुरू असलेले भाषण क्षणभर थांबवल आणि आवंढा गिळला. जर मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर…आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. हजारो कुटुंबचा स्वप्न साकार होत आहे, महाराष्ट्रातील एक लाख लोकांना हक्काचे घर मिळत आहे. आम्ही चार कोटी पेक्षा जास्त पक्के घरे बनवले आहे, असं मोदी म्हणाले.

Published on: Jan 19, 2024 04:18 PM