कडू कारले तुपात तळले की साखरेत घोळले, कडू ते कडूच… मोदींचा रोख कुणावर?
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत आहेत. त्यांचा आनंद आहे, असे मोदी म्हणाले. इतकंच नाही तर मोदींनी मराठी म्हणीचा वापर करत मोदींनी काँग्रेला कडू कार्ल्याची उपमा दिली. कडू कारले तुपात तळले की साखरेत घोळले... कडू ते कडूच, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला.
महाराष्ट्रातील पहिल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी टीका केली. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. तर यावेळी मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत आहेत. त्यांचा आनंद आहे, असे मोदी म्हणाले. इतकंच नाही तर मोदींनी मराठी म्हणीचा वापर करत मोदींनी काँग्रेला कडू कार्ल्याची उपमा दिली. कडू कारले तुपात तळले की साखरेत घोळले… कडू ते कडूच, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपुरात झाली. चंद्रपुरातून भाजपने लोकसभेची उमेदवारी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली. भाजपच्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सामना काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याशी आहे. त्यामुळे निवडणुकीच टफ फाईट असल्याने विजयी कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.