मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका अन् आरामदायी प्रवास, ‘या’ दोन मेट्रो मार्गिका खुल्या
मेट्रो मार्गिका 2 ए (दहिसर-डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव-गुंदवली या दोन नव्या मार्गिकेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
मेट्रो मार्गिका 2 ए (दहिसर-डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव-गुंदवली या दोन नव्या मुंबई मेट्रो मार्गिकेचे काल 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मुंबई मेट्रो लाईन 2 ए आणि मेट्रो 7 आजपासून प्रवाशांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या दोन मार्गिकेमुळे मुंबईकरांची वाहतूक कोडींच्या समस्येतून सुटका होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे. दोन नव्या मार्गिका खुल्या झाल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, एसव्ही, लिंक रोडवरील वाहतूक हलकी होणार आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांना देखील दिलासा मिळाला आहे. या दोन मेट्रो लाईन बनविण्यासाठी साधारण 12 हजार 600 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मुंबई दौऱ्यात 40 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यावेळी मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2ए आणि 7 याचे उद्धाटनही करण्यात आले. यादरम्यान त्यांनी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंदही लुटला.