ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना…., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची खरमरीत टीका?
रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या महामुलाखतीवर टीका केली आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत मोदींना टीव्ही ९ नेटवर्कच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी विविध मुद्द्यावर सवाल केले होते. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता.
ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना कुटुंब काय समजणार? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या महामुलाखतीवर टीका केली आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत मोदींना टीव्ही ९ नेटवर्कच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी विविध मुद्द्यावर सवाल केले होते. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता. या वयात जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवाल करत मोदींनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. मोदींच्या या टीकेनंतर रोहित पवारांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. पुढे रोहित पवार असेही म्हणाले, ‘पवार साहेबांना त्यांचं कुटुंब जपता येत नाहीतर महाराष्ट्राला काय जपणार? मोदी साहेब तुमच्या तोंडून ही भाषा नाहीतर कुटुंबाबद्दलचे चार शब्द लोकांना पटतील का? तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच आपल्या पत्नीला सोडलं. अशी तुमची प्रवृत्ती असेल तर कुटुंब काय असतं तुम्हाला काय कळणार?’, असा सवाल करत रोहीत पवार यांनी जिव्हारी लागणारी टीका मोदींवर केली आहे.