PM Modi Kashi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरवाची आरती

PM Modi Kashi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरवाची आरती

| Updated on: Dec 13, 2021 | 12:31 PM

कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर पुजारी यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान

काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणानिमित्त नरेंद्र मोदी काशी वाराणसीमध्ये पोहोचले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पणानिमित्त काल भैरव मंदिरात आरती करण्यात आली. काल भैरव मंदिराकडे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. कालभैरव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर पुजारी यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी मधील काल भैरव मंदिरात आरती केल्यानंतर गंगा नदीत पुजा केली. गंगा नदीतील ललिता घाटावर नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.