Republic Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

Republic Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

| Updated on: Jan 26, 2023 | 11:11 AM

शहीद जवानांच्या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवानांना वाहिली श्रद्धांजली

देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध धर्म, जातीचे लोक एकत्र वास्तव्य करतात आणि हीच भारत देशाची ताकद आहे. तर नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर दरवर्षी पथसंचलन, परेड होत असते. याठिकाणी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होत असतात. मात्र कर्तव्यपथावर दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी नॅशनल वॉर मेमोरियल अमर जवान ज्योती युद्ध स्मारक येथे दाखल पंतप्रधान दाखल होतात.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो योद्ध्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या योद्ध्यांच्याप्रति एक आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान याठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून जवानांना श्रद्धांजली वाहिली.

 

Published on: Jan 26, 2023 11:11 AM