मालेगावच्या शेतकऱ्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडून दखल, का केलं कौतुक?
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून थेट मालेगावच्या शेतकऱ्याचं कौतुक, आधी आपलं जीवन देश सेवेसाठी वाहून टाकलं अन् आता...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शेतकरी शिवाजी डोळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमामध्य कौतुक केले आहे. ते माजी सैनिकही आहेत. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. त्याची महती आता देशभरात गेली आहे. मन की बात मध्ये एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे प्रतिबिंह आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी श्मामराव डोळेजी. शिवाजी डोळे नाशिक जिल्हयातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त कसे योगदान दिलं जावं. आपल्या या मोहिमेत शिवाजी डोळे यांनी २० लोकांची असं एक पथक बनवलं आणि काही माजी सैनिकांनाही त्यात सामिल करून घेतल्यानं त्यांचं मोदींकडून आवर्जून कौतुक करण्यात आलं.