चित्ते की चाल आणि मोदींची फोटोग्राफी; कूनो पार्कमध्ये चित्ता राज!
हे चित्ते काही दिवस अभारण्याच्या विशिष्ट परिसरात ठेवण्यात येणार आहेत. त्यांना या जंगलातील हवा आणि पानी मानवतं की नाही याचा काही दिवस अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे.
भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्ताने नामीबियातून भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. भारतातून (india) चित्ते लुप्त झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात चित्त्यांची डरकाळी पाहायला मिळणार आहे. मध्यप्रदेशातील कूनो नॅशनल वन पार्कमध्ये (Kuno National senchuri) हे चित्ते सोडण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हे चित्ते अभारण्यात सोडण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या नव्या पाहुण्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. मोदींनी पटकन एकावर एक क्लिक करत अभयारण्यात जाणाऱ्या या नव्या पाहुण्यांचे फोटो काढले. हे चित्ते काही दिवस अभारण्याच्या विशिष्ट परिसरात ठेवण्यात येणार आहेत. त्यांना या जंगलातील हवा आणि पानी मानवतं की नाही याचा काही दिवस अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर त्यांना जंगलात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे.