Tv9 Special Report | अविश्वास ठराव पडला, मोदी सरकारचा दबदबा अन् विरोधकांवर मोदी स्ट्राईक!
VIDEO | राहुल गांधी यांच्यासह विरोधकांच्या इंडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल, काय केली टीका; बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १० ऑगस्ट २०२३ | विरोधकांचा अविश्वास ठराव मोदी सरकारच्या बहुमतापुढे पडलेला आहे आणि विरोधकांवर सरकारने विजय मिळवला आहे. मात्र मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांच्या ‘इंडिया’वर हल्लाबोल केलाय. तर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. अविश्वास ठरावावरून विरोधकांसह राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्या प्रत्येक टीकेवर मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून विरोधकांची एकजूट आणि ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. मागील तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यापासून सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अखेर आज विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत फेटळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले. बघा काय सोडलं टीकास्त्र…