जरीचा फेटा…सोलापुरी चादर अन्… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सजली
सोलापुरात दाखल झाल्यानंतर 30 हजार गृह प्रकल्पाच्या डेमो प्लॅटची पाहणी आणि योगा सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर, हातमागावर विणलेली शॉल, सोलापुरी फेटा, स्मृतीचिन्ह आणि बुके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सोलापूर, १८ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्या सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन होणार आहे. सोलापुरात दाखल झाल्यानंतर 30 हजार गृह प्रकल्पाच्या डेमो प्लॅटची पाहणी आणि योगा सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर, हातमागावर विणलेली शॉल, सोलापुरी फेटा, स्मृतीचिन्ह आणि बुके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर रे नगर येथील 15 घरे आणि महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेतून साकारलेल्या 90 हजार घरांचे लोकार्पण करण्यात येईल. अमृत योजनेतून 8 शहर आणि जिल्ह्यातील 1700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी, 10 हजार लाभार्थ्यांना PM स्वनिधी योजनेतून कर्जवाटप, रे नगर प्रकल्पातील येथील 5 लाभार्थी महिलांना मोदींच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे. उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सजली आहे.