‘विरोधक म्हणताय मर जा मोदी, पण जनता म्हणतेय मत जा मोदी…मत जा मोदी’
VIDEO | त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांचा दिल्लीतील भाजप मुख्यालयातून विरोधकांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मोदी म्हणाले- आमच्या विजयाची भीती असलेले काही कट्टर विरोधक म्हणतात, मोदी मर जा, पण माझे देशवासी म्हणतात मत जा मोदी. ईशान्य पूर्वच्या निकालानंतर टीव्हीवर ईव्हीएमचा गैरवापर होऊ लागला की नाही, असा निशाणाही साधला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना याबाबत सवालही उपस्थित केला आहे. नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. दोन्ही राज्यात भाजप आघाडीला अनुक्रमे 37 आणि 33 जागा मिळाल्या. दुसरीकडे, मुख्यमंत्री कोनराड संगमा यांचा एनपीपी मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या पारड्यात एकूण 26 जागा आल्या आहेत.