लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले, मला पूर्ण विश्वास...

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले, मला पूर्ण विश्वास…

| Updated on: Mar 16, 2024 | 6:49 PM

निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप, एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली, 16 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप, एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटवर पोस्ट करत भाजप-एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजप-एनडीए या निवडणुका लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. सलग तिसऱ्यांदा मतदारांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. 140 कोटी भारतीयांच्या शक्तीने आपले राष्ट्र विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. करोडो लोकांची गरिबीतून मुक्तता झाली आहे. आमच्या योजना भारताच्या सर्व भागांमध्ये पोहोचल्या आहेत, त्यामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत, असेही मोदी यांनी आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

Published on: Mar 16, 2024 06:49 PM