New Parliament : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचा उद्धाटन, कसा असणार कार्यक्रम?

New Parliament : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचा उद्धाटन, कसा असणार कार्यक्रम?

| Updated on: May 28, 2023 | 8:39 AM

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेचं उद्घाटन करणार, सकाळी सव्वासात वाजल्यापासून सोहळा सुरू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच हा भव्य सोहळा सुरू झाला आहे. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार होणार आहे. उद्घाटन समारंभ दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 7.15 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत पूजा होईल. त्यानंतर 11.30 वाजल्यापासून उद्घाटन समारंभ होणार आहे. या सोहळ्याला सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर पंतप्रधान मोदी सेंगोल घेऊन नव्या संसदेकडे रवाना झालेत. अधिनम मठाच्या संतांनी मोदींच्या हाती सेंगोल दिलं यानंतर संगोलची नव्या इमारतीत प्रतिष्ठापणा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला हे सुध्दा उपस्थित होते. दुपारी एक वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ऐतिहासिक वास्तूच्या लोकार्पणावेळी 75 रूपयांचं नाणं चलनात आणणार आहे.

Published on: May 28, 2023 08:38 AM