पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत? कधी आणि केव्हा, काय आहे कारण?
बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी हे मुंबईत येणार असून बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मुंबईच्या मरोळमध्ये बोहरी मुस्लिम यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आपली हजेरी लावण्याची शक्यता आहे.
१९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्यानंतर अवघ्या २० ते २१ दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा मुंबईत दाखल होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील मेट्रो २ आणि मेट्रो ७ चे लोकार्पण केले आणि काही कामांचे भूमिपूजन देखील केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी बीकेसीच्या मैदानात जाहीर सभा घेऊन आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
