Pune PMPML Bus | पुण्यात PMPML ची बस गेली चोरीला, नेमका काय घडला प्रकार?
VIDEO | पुण्यातील PMPML बस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार; चोरलेली बस मार्केट यार्ड परिसरात सापडली अन्... पुण्यात नेमकं घडलं तरी काय?
पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील पालखी सोहळ्यामुळे बस लावण्यास जागा नसल्याने पीएमपीएमएल बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली. बसमध्ये चावी असल्याने चोरट्याने बसच पळवली. ही बस मार्केट यार्ड परिसरात सोडून चोरटा पसार झाल्याचे सांगितले जात आहे. चोरट्याने या बसमधील महागडी बॅटरी चोरून नेल्याचेही उघडकीस आले आहे. घडलेल्या या धक्कदायक प्रकाराबाबत चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएपीएमएलच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Published on: Jun 16, 2023 08:17 AM
Latest Videos