Women’s Day 2023 : जागतिक महिला दिनानिमित्त PMPML कडून महिलांना मोठं गिफ्ट, महिन्यातून एक दिवस…
VIDEO | जागतिक महिला दिनानिमित्त PMPML कडून पुण्यातील महिलांना भन्नाट गिफ्ट
पुणे : अवघ्या काही दिवसांवर जागातिक महिला दिन येऊन ठेपला आहे. या दिवशी महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशातच पुण्यातील महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून मोठं गिफ्ट देण्यात आले आहे. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिनापासून दर महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून पुण्यातील महिलांना मोफत प्रवास सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना हे मोठं गिफ्ट असून पुण्यातील महिलांना दिलासा असणार आहे. मार्च २०१९ मध्ये प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर पीएमपीएमएलकडून खास महिलांसाठी २३ मार्गावर तेजस्विनी बसेस सुरू कऱण्यात आल्या होत्या. दरम्यान आता ही सेवा पुन्हा महिला दिनाच्या निमित्ताने पूर्ववत केली जाणार आहे.