कोर्लईच्या माजी सरपंचाला अटक, रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
VIDEO | रेवदंडा पोलिसांनी कोर्लेई गावातील 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई, किरीट सोमय्यांनी काय केला दावा?
अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर 19 बंगल्याचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. याचं चौकशीमध्ये अनेक जण आरोपी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी देखील केलेला आहे, त्याच संदर्भात काल रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावाच्या माजी सरपंच प्रसाद मिसाळ यांना ताब्यात घेतले आहे. प्रसाद मिसाळ यांची पोलीस चौकशी करत असून त्यांना आज मुरुड कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, रेवदंडा पोलिसांनी कोर्लेई गावातील 19 बंगले घोटाळा आरोपांच्या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी कोर्लई गावच्या माजी सरपंचांना अटक केली आहे. त्यामुळे आता रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच उद्धव ठाकरे परिवाराच्या 19 बंगले घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी कोर्लईच्या प्रशांत मिसाळ या माजी सरपंचाची अटक केल्यानंतर 19 बंगल्यांचा हिशोब उद्धव ठाकरे यांना द्यावाच लागणार, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.