Ladki Bahin Yojana : भाजप आमदाराविरोधात 'लाडक्या बहिणी' भडकल्या, थेट गाठलं पोलीस स्टेशन, कारण काय?

Ladki Bahin Yojana : भाजप आमदाराविरोधात ‘लाडक्या बहिणी’ भडकल्या, थेट गाठलं पोलीस स्टेशन, कारण काय?

| Updated on: Jul 30, 2024 | 2:29 PM

पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले होते. त्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्ममंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्यासोबत काही महिलांचे फोटो दिसताय. मात्र...

पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांच्याविरोधात महिलांनी पोलिसांत एक तक्रार केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, या संदर्भात काल सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले होते. त्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्ममंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्यासोबत काही महिलांचे फोटो दिसताय. मात्र संमतीशिवाय फोटो बॅनरवर लावला असल्याचा आरोप या बॅनरवर फोटो असणाऱ्या महिलांनी केला आहे. इतकंच नाहीतर कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

Published on: Jul 30, 2024 02:29 PM