VIDEO : Nashik मध्ये सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून धिंड, पोलिसांनी दाखवला दणका
देशभरात नाशिकचे (Nashik) उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईम (Crime) नगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक ही धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे. काही दिवसांपूर्वी एकामागे एक झालेले तीन खून. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची झालेली हत्या. या साऱ्या घटनांनी राज्य ढवळून निघाले.
देशभरात नाशिकचे (Nashik) उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईम (Crime) नगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक ही धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे. काही दिवसांपूर्वी एकामागे एक झालेले तीन खून. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची झालेली हत्या. या साऱ्या घटनांनी राज्य ढवळून निघाले. हे प्रकरण थेट विधिमंडळात पोहचले. आता त्याच नाशिकमध्ये चक्क हातात कोयते आणि तलवारी घेऊन काही भाई लोकांनी चक्क रस्त्यावर नंगानाच केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हे सारे खून, हाणामाऱ्या प्रकरणातील आरोपी आहेत. याचा सुगावा पोलिसांनी लागताच त्यांनी या भाई लोकांची मस्ती चक्क धिंड काढून जिरवली. त्यानंतर कोणी पुन्हा असा प्रकार करायला धजावणार नाही, असा पोलिसी इंगा त्यांना दाखवला.
Latest Videos