संभाजी भिडे यांच्याकडून चार दिवसात दोनदा वादग्रस्त वक्तव्य; वाशिम येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला?

संभाजी भिडे यांच्याकडून चार दिवसात दोनदा वादग्रस्त वक्तव्य; वाशिम येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला?

| Updated on: Jul 30, 2023 | 11:34 AM

भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, तोच मुस्लीम जमीनदार गांधीजी यांचे वडील आहेत.

वाशिम, 30 जुलै, 2023 | वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी गेल्या चार दिवसात दोन वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, तोच मुस्लीम जमीनदार गांधीजी यांचे वडील आहेत. तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही भिडे यांनी केला होता. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अखंड भारतासाठी नखाएवढेही योगदान नाही. तर कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले, अशी टीका देखील केली आहे. त्यानंतर राज्यात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर आज वाशिम येथे होणाऱ्या भिडे यांच्या व्याख्यानाला काँग्रेस आणि वंचितने विरोध दर्शवला आहे. ज्यामुळे सुरक्षिततेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर व्याख्यान स्थळी संभाजी भिडे येणार त्या मार्गावर अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित सह इतर सामाजिक संघटनेच्या वतीने काळे रुमाल निषेध करण्यात येत आहे.

Published on: Jul 30, 2023 11:34 AM