Mumbai | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त
Maharashtra Bandh | 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त. लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Latest Videos