‘… हे सरकारचं पाप’, नागपुरात युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून नाना पटोले यांना थेट उचलंलं अन्…
कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बदनाम करत आहेत. म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनावर निघाला आहे. सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, नागपुरातील युवक काँग्रेस मोर्च्यात नाना पटोले सरकारवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले
नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळांच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. तर दुसरीकडे नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला धडकण्यासाठी निघाला असताना या मोर्च्यात आंदोलकांना सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सर्व तरूण या मोर्च्याच्या माध्यमातून आक्रमक होत एकवटल्याचे पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांनी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केल्यानं नागपूर पोलीस सतर्क झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली. तर या मोर्च्यात सहभागी झालेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील पोलिसांनी थेट उचलून नेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, पोलिसांना अशाप्रकारे पाठवणं हे सरकराचं पाप आहे. हे सरकार तरुणांचा आवाज दाबायला लागलंय. तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्रात लाखो पदं खाली आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बदनाम करत आहेत. म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनावर निघाला आहे. सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, असेही नाना पटोले म्हणाले.