मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली

मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली

| Updated on: Feb 24, 2022 | 10:52 AM

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून काल कारवाई करण्यात आली. बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले व नंतर अटक देखील करण्यात आली. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published on: Feb 24, 2022 10:52 AM