Ganesh Chaturthi 2021 | लालबागमध्ये पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की
क्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.
धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याप्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. याच बरोबर माणसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.