Lonavla Lockdown | लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट, धबधब्यांवर पोलीस बंदोबस्त
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे. मावळ तालुक्यातील धबधबे तसेच लोणावळा, खंडाळा या पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पुणे ग्रामीण पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र या पर्यटनबंदीच्या निर्णयाने हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे पुरते हाल झाले आहेत. दरम्यान, लोणावळा-खंडाळा पर्यटन स्थळ निर्मनुष्य आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गर्दी होणारा लोणावळा परिसर सध्या निर्मनुष्य आहे.
Latest Videos