Chhagan Bhujbal : … म्हणून छगन भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सिद्धगड येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथकाला छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे काल बीड दौऱ्यावर होते. बीड दौऱ्यावर असताना भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठ्यांना कुणबीमधून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या निर्णयावर विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे, अशी मनोज जरांहे यांची मागणी आहे. मात्र या मागणीवरून छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सिद्धगड येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत आहे. मोठ्या फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथकाला छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले असून छगन भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा थेट दावा भुजबळ यांनी केला इतकंच नाहीतर ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचेही मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केल्याचे पाहायला मिळाले.