दापोलीतील साई रिसॅार्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दापोलीतील साई रिसॉर्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. किरीट सोमय्या यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे.
दापोलीतील साई रिसॉर्टबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. किरीट सोमय्या यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे. तर साई रिसॉर्ट परिसराला सध्या छावणीचं स्वरुप आलंय. साई रिसॉर्टच्या बांधकामाबाबत किरीट सोमय्या यांनी विविध मुद्दे उपस्थित केले होते. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी आंदोलनंसुद्धा झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या रिसॉर्टचा वाद सुरू आहे. किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी ते करणार आहेत.
Latest Videos