VIDEO : Beed | जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, तब्बल 75 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथील जुगाराच्या अड्यावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत 47 जुगाऱ्यांसह तब्बल 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तब्बल 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही समावेश आहे. बीड तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथील जुगाराच्या अड्यावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत 47 जुगाऱ्यांसह तब्बल 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
Latest Videos