‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर…’, पोलीस कर्मचाऱ्याचा टोकाचा इशारा, उदयनराजे भोसले म्हणाले…
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी साताऱ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली
नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईत आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. अशातच साताऱ्यात नाट्यमय घडामोडी घडताना दिसताय. साताऱ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केलं. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी साताऱ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. शिवेंद्रराजे यांना मंत्रीपद द्या. अन्यथा टॉवरवरुन उडी मारेन, असा टोकाचा इशारा पोलीस कर्मचाऱ्याने दिला आहे. प्रशासनाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टॉवरवरुन खाली उतरण्याची वारंवार विनंती केली. मात्र पोलीस कर्मचारी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर खासदार उदयनराजे भोसले यांना या आंदोलनाची माहिती मिळताच या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली. उदयनराजे भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्याची फोनवरुन समजूत काढली. उदयनराजे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली. ‘आयुष्य एकदाच येतं आणि कुणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. मग तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना मला कळाल्या, जे काही असेल ते नंतब बघुना. तुम्ही एकदा मला भेटायला या.’, असे उदयनराजे भोसले या पोलीस कर्मचाऱ्याला म्हणाले.