राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? अंदाज अपना-अपना, काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
येत्या ४ जूनला कोणाचं सरकार बनणार याचा निकाल अवघ्या काही दिवसांत समोर येणार आहे. यापूर्वीच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात कुणाची हवा राहणार… महाविकास आघाडी की महायुती?
देशात ४ जूनला कोणाचं सरकार बनणार याचा निकाल अवघ्या काही दिवसांत समोर येणार आहे. यापूर्वीच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात कुणाची हवा राहणार… महाविकास आघाडी की महायुती? याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्यातील आकडे काय असणार? राज्यात महाविकास आघाडी की महायुती या दोघांपैकी कोण ४० पार जाणार? नेमका कसा आहे महाराष्ट्राचा मूड आणि काय असणार यामध्ये राजकीय विश्लेषकाचं मत जाणून घेता, त्यांच्यातही मत मतांतर आहे. काहींच्या मते महायुती ४० पर्यंत पोहोचू शकतो. तर काही म्हणतात यंदा महाराष्ट्रात एनडीएचं सर्वाधिक नुकसान होणार… महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार याबाबत आता अनिल थत्ते यांनी भविष्यवाणी केली आहे. ३५ ते ४० जागा महायुतीला मिळतील, म्हणजेच ८ ते १५ जागा महाविकासआघाडीला मिळतील, असा अनिल थत्ते यांनी अंदाज वर्तविला आहे.