पुन्हा मोदी येणार? NDA की INDIA… देशात आणि महाराष्ट्रात 4 जूनला काय होणार?
अखेरच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये उत्तरप्रदेशच्या १३ जागा, पंजाबच्या १३ जागा, पश्चिम बंगालच्या ९ जागा, बिहारच्या ८ जागा, ओडिशा ६ जागा, हिमाचल प्रदेशच्या ४ जागा, झारखंडच्या ३ तर चंदीगडच्या एका जागेवर मतदान होणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. आता प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या आहेत. अशातच शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात मतदान होणार आहे. अखेरच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये उत्तरप्रदेशच्या १३ जागा, पंजाबच्या १३ जागा, पश्चिम बंगालच्या ९ जागा, बिहारच्या ८ जागा, ओडिशा ६ जागा, हिमाचल प्रदेशच्या ४ जागा, झारखंडच्या ३ तर चंदीगडच्या एका जागेवर मतदान होणार आहे. तर विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदानसंघात हे शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात मोदींनी रोडशो आणि पूजापाठही केलाय. त्यामुळे सर्वांचं लक्ष या शेवटच्या टप्प्याकडे लागलं आहे.तर लोकसभा निवडणुकीचा निकालही अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र या निकालावर राजकीय विश्लेषक नेमकं काय म्हणताय?