Special Report | पुणे निवडणुकीच्या तोंडावर ‘दादा’गिरीची सुरुवात? -Tv9
मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant Patil ) यांच्या वक्तव्याबदल बोलताना केली आहे.
पुणे – चंद्रकांत पाटील म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आहे. अजित पवार (Ajit pawar) सारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. मोठ्या माणसांच्या बद्दल मोठ्या माणसांना बोलल पाहिजे अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant Patil ) यांच्या वक्तव्याबदल बोलताना केली आहे. काल पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते . असे ते म्हणाले होते.