Special Report | भोंग्यांवरुन ‘राज’कीय कल्ला
हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
पुणे: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.