Special Report | हिंसाचारावरूनही आता राजकारण होणार का?

| Updated on: Nov 14, 2021 | 10:00 PM

बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं सांगतात. मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशात का नाही? दिल्लीत का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे.

मुंबई: हिंसा भडकावण्याची ताकद रझा अकादमीमध्ये कधीच नव्हती. सरकारने त्यांच्यावर कधीच नियंत्रण आणलं आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील हिंसाचारामागे रझा अकादमी नव्हती तर या हिंसाचारामागे कोण आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारात आपला हात नसल्याचं रझा अकादमीने काल स्पष्ट केलं होतं. तर संजय राऊत यांनी आज थेट रझा अकादमीलाच क्लिन चीट देणारं विधान केलं आहे.रझा अकादमी काय म्हणते मला माहीत नाही. पण महाराष्ट्रात हिंसाचार किंवा दंगली घडवण्या इतकी ताकद किंवा समर्थन रझा अकादमीकडे कधीच नव्हतं. काही वेळेला रझा अकादमीने लोकांची डोकी भडकवली आहे. पण त्यांच्यावर सरकारने पूर्ण नियंत्रण आणलं आहे, असं राऊत म्हणाले. खरंतर त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे? त्रिपुरात असं काय घडलं की त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी? बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं सांगतात. मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशात का नाही? दिल्लीत का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काही तरी कारस्थान आहे असं वाटतं, असा आरोप त्यांनी केला.