Video: मराठवाड्यातील राजकारण टीपेला, मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वार-पलटवार

Video: मराठवाड्यातील राजकारण टीपेला, मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वार-पलटवार

| Updated on: Aug 28, 2022 | 7:23 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी दोन आमदार शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक असल्याचे विधान केल्याने, नवा वाद निर्माण झाला आहे. हे दोन आमदार कोणते यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी भुमरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

औरंगाबाद – राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार आल्यानंतर, मराठवाड्यातील राजकीय नेत्यांचे वजन वाढलेले आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्रीपदे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळालेले आहे. त्यामुळे आता तिथले राजकारणही एकमेकांवर कुरघोडी, आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजताना दिसते आहे. रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी दोन आमदार शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक असल्याचे विधान केल्याने, नवा वाद निर्माण झाला आहे. हे दोन आमदार कोणते यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी भुमरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पैठणमध्ये काल झालेल्या संदीपान भुमरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकाम्या होत्या, याची आठवण करुन देत, अंबादास दानवे यांनी सदीपान भुमरे यांनी आधी स्वताच्या मतदारसंघात लक्ष घालावे अशी आठवण करुन दिलेली आहे. पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना रोहयो आणि फलोत्पादनमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काल त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे जनतेचा भुमरे यांना किती पाठिंबा आहे, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतो आहे.

Published on: Aug 28, 2022 07:23 PM