Devendra Fadnavis | राजकारण हा सिरीयस बिझनेस, उगाच अंदाज बांधू नका : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 18, 2021 | 9:03 PM

देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

धुळे : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युतीबाबत एक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी नंदुरबारमध्ये या घडामोडींचा दुसरा अंक पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत आणि एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावरुनही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज धुळ्यात बोलत होते.