Sambhaji Nagar च्या सिध्दार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरुन राजकारण, ‘आदित्य’ नावाची पहिली चिठ्ठी अन्…
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच रंगलंय. सिद्धार्थ उद्यानातील बछड्याला आदित्य नाव देणं सुधीर मुनगंटीवार यांनी टाळलं अन्...
छत्रपती संभाजीनगर, १७ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरणावरून राजकारण चांगलंच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आदित्य नावाच्या एका चिठ्ठीवरून चर्चा सुरू झाल्या असून या एका चिठ्ठीवरूनच राजकारण चांगलंच रंगलंय. तर छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील बछड्याला आदित्य नाव देणं सुधीर मुनगंटीवार यांनी टाळलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या बछड्याला आदित्य नाव देणं टाळल्याने ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य केले आहे. यावेळी चंद्रकांत खैरे थेटच म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांना आदित्य नावाची भिती असल्याचे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सिद्धार्थ उद्यानातील बछड्याच्या नामकरणाच्या वेळी चिठ्ठी काढण्यात आली आणि पहिली चिठ्ठीच आदित्य नावाची आल्याने एकच चर्चा सुरू झाली.