पवित्र गोदावरी बनली गटारगंगा ! नदीतील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात, काय कारण?
VIDEO | गोदावरी नदीपात्रात शहरातील 28 नाल्याचे दूषित पाणी, प्रशासन तरी ही सुस्त
नांदेड : दक्षिण भारताची गंगा अशी महाराष्ट्रातील गोदावरीची ओळख आहे. नाशिकमधून उगम पावणारी ही नदी नांदेडमध्ये नाभी स्थानी आहे. मात्र या पवित्र गोदावरी नदीला गटारगंगा करण्याचं काम प्रशासनाने केल्याचं आरोप केला जात आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात गटाराचे पाणी मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झालीय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात असलेल्या जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या नदीत बऱ्याचदा मृत मासे नदी किनारी आल्याचे पाहायला मिळाले होते. तर या नदीत असणारे पाण कोंबड्यांची संख्या प्रदुषणामुळे कमी झाली असून ते नाहीसेच झाले आहे. तर पवित्र अशा या गोदावरीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केलीये. नदीच्या पाण्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने नदीजवळ येणं सर्वसामान्यांना अशक्य बनलंय. शहरातील एकूण 28 नाल्याचे दूषित पाणी गोदावरीत मिसळत असून त्याकडे प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाहीये.