दुरावस्था झालेल्या रस्त्याची चाळण, चिखलात फसलेल्या बसला विद्यार्थ्यांचा 'दे धक्का'!

दुरावस्था झालेल्या रस्त्याची चाळण, चिखलात फसलेल्या बसला विद्यार्थ्यांचा ‘दे धक्का’!

| Updated on: Jul 28, 2023 | 1:29 PM

VIDEO | रस्त्यावर चिखल साचल्याने स्कूल बसला अडथळा; विद्यार्थ्यांनी चिखलात अडकलेली बस ढकलली

छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै 2023 | छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याची चाळण झाल्याचे समोर आले आहे. जळगाव ते खिर्डी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे दुरावस्था असलेल्या या रस्त्यात एकच पाणी आणि चिखल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या चिखलातच फसलेल्या बसला ढकलण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी चिखलात अडकलेली बस ढकलली आणि फसलेल्या बसला मार्ग करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी बस ढकलत असताना सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे दोन वर्षांपासून राजुरा- गोवरी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. गोवरी नाल्यावरील पुलाचे काम पावसाळ्यात सुरू आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. नाल्यावरील कच्चा रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

Published on: Jul 28, 2023 01:29 PM