Special Report | कामगारांना निष्कृष्ट दर्जाचं जेवण, संतोष बांगर भडकले आणि डायरेक्ट व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली

Special Report | कामगारांना निष्कृष्ट दर्जाचं जेवण, संतोष बांगर भडकले आणि डायरेक्ट व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली

| Updated on: Aug 15, 2022 | 9:02 PM

बुरशी आलेल्या चपात्या, किडे लागलेली चन्याची डाळ, सडलेले कांदे निदर्शनास आले. सरकारकडून पैसे घेऊनही कामगारांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ पाहून संतोष बांगर यांचा राग उपहारगृह व्यवस्थापकावर निघाला. संतोष बांगर भडकले आणि डायरेक्ट व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली.

हिंगोली : कामगार कल्याण मंडळाकडून असंघटित कामगारांसाठी मध्यान्ह भोजन ही योजना सुरु करण्यात आली. त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात गुनिना कंपनीला कंत्राट मिळालंय. संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी तक्रारीनंतर पाहणी केली. त्यानंतर बुरशी आलेल्या चपात्या, किडे लागलेली चन्याची डाळ, सडलेले कांदे निदर्शनास आले. सरकारकडून पैसे घेऊनही कामगारांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ पाहून संतोष बांगर यांचा राग उपहारगृह व्यवस्थापकावर निघाला. संतोष बांगर भडकले आणि डायरेक्ट व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली. गावागावात टेम्पोच्या माध्यमातून गरीब असंघटित कामगारांना जेवणाचे डबे पुरवले जातात. मात्र किचनची अवस्था पाहिली तर इथलं जेवण जनावरंही खाणार नाहीत, अशी स्थिती आहे.

लिंबाळा इथं किचनची पाहणी करत असतानाच, बांगर यांनी फोनवरुनही अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.यासंदर्भात जिल्हा कामगार अधिकारी टीएस कराड यांना विचारलं असता संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिलीय. पण मीडियासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. बांगर यांनी व्यवस्थापकाला कानशिलात का लगावली ?, यावरुन सवाल उठू शकतात. पण कामगांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ चिड आणणारा आणि संतापजनकच आहे. त्यामुळं सरकारनं अशा कंपन्यांवर तात्काळ कारवाई करुन, कठोर कारवाई केली पाहिजे..कारण प्रश्न गरिबांची फसवणूक आणि त्यांचा जीवाचा आहे.

Published on: Aug 15, 2022 09:02 PM