राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन आता ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 18 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती. मात्र राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक त्यावेळी झाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 25 जुलैपासून अधिवेशन सुरू होईल असं म्हटलं जात होती. मात्र आता ती तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल अशी माहिती आहे.
Published on: Jul 21, 2022 04:47 PM
Latest Videos