नितेश राणे यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टरबाजी
संतोष परब हल्ल्याप्रकरणात नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता राणे यांच्या समर्थनार्थ पिंपरी -चिंचवडमध्ये त्यांच्या समर्थकांनी पोस्टर लावले आहेत.
पुणे : संतोष परब हल्ल्याप्रकरणात नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला होता. मुंबईमध्ये नितेश राणे यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. दरम्यान दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र नितेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर नितेश राणे यांचा फोटो आहे. जिंकण्याची जिद्द अशी हवी की आपल्याला हरवण्यासाठी कट रचले गेले पाहिजे असा मजकूर या पोस्टरवर आहे.
Latest Videos