आदित्य ठाकरे यांचा फोटो असलेले शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलचे पोस्टर फाडले; कोणाचं कृत्य?
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये शिवरायांचे आठवावे रूप या संकल्पनेतंर्गत 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती' मुंबईकरांना पाहता येणार
मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ऐतिहासिक स्थळाचा कलेच्या माध्यमातून गौरव करण्यासाठी युवासेना प्रमुख व ठाकरे गटाचे आमदार आदित्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल २०२३ चे संयोजन ‘वेध’ या सामाजिक संस्थेमार्फत दि.२ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलेले आहे. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कला महोत्सवामध्ये शिवरायांचे आठवावे रूप या संकल्पने अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती’ मुंबईकरांना पाहता येणार आहेत. दरम्यान, दादरमध्ये आदित्य ठाकरेंच्या शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलचे बॅनर जागोजागी लावण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांचा फोटो असलेले शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलचे बॅनर फाडल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याचे सांगितले जात आहे.