आशिष शेलार यांच्या ‘त्या’ तक्रारीमुळेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित? ठाकरे बंधू सरकारवर भडकले
VIDEO | मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित, शासन निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र जाहीर, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोनही ठाकरे बंधू सरकारवर भडकले अन् काय विचारला जाब? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगिती देण्यात आलीये त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सरकारला जाब विचारलाय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्यामागील कारणं काय आहेत? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित झाल्यानंतर राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. सिनेट निवडणुका स्थगित झाल्याचे पत्र काल रात्री मुंबई विद्यापीठाने अचानक काढलं. या पत्रकात शासन निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला धारेवर धरलंय. मतदार यादीमध्ये तफावत आहे, अशी तक्रार आशिष शेलार यांनी राज्यपालांकडे केली होती. आशिष शेलार यांच्या तक्रारीनुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांनी स्थगिती दिलीये. तर विद्यापीठ कुलसचिव आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आशिष शेलार यांना पत्र लिहीलं होतं. बघा नेमकं काय म्हटलं आशिष शेलार यांनी….